विश्वजीत रमेश कासार व त्यांच्या साथीदारांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील वाळकी येथील ओमकार भालसिंग यांच्यावर खूनी हल्ला करणारा विश्वजीत कासार व त्याचे साथीदार सुनील अडसरे, शुभम लोखंडे, सचिन भामरे, इंद्रजीत कासार यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान कारवाई बाबतचे निवदेन मयत मुलाची आई लता भालसिंग व वाळकी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे. सदर आरोपींवर अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, जालना जिल्हा व इतर ठिकाणी खंडणी, खून, दरोडा, अपहरण, जबरी मारहाण, फसवणूक यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे.

तसेच त्यांना नगर जिल्हा न्यायालयाने दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये दहा वर्षे शिक्षा सुनावली होती व ते हायकोर्टातून जामिनावर मुक्त आहे. परंतु त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये कोणतेही बदल झालेले नाही.

विश्वजीत कासार हा त्याचे टोळीचा मुख्य मोरक्या असून तो त्याचे इतर साथीदारांसह गुन्हे कायम करतो व केलेल्या गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली आहे.

त्यांच्यापासून समाजास व आम्हा सर्व गावकऱ्यांना खूप त्रास होत आहेत व आम्हाला आमचे जीवन धोक्याचे वाटते अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे नगर तालुक्यातील वाळकी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment