Ahmednagar News : सध्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीना त्रास देण्याच्या घटना वाढत असून यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. टारगट तरुणांच्या या वर्तणुकीचा फटका अनेक तरुणींना बसत आहे. हा त्रास नको असे म्हणत अनेक पालक मुलींना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवणे टाळत आहेत.
श्रीरामपूर येथे नर्सिंग कोर्ससाठी आलेल्या विद्यार्थिनीला तू माझ्याशी व्हॉटसअपवर का बोलत नाही, माझ्यासोबत रिलेशनशीपमध्ये राहा, असे म्हणत विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिला मारहाण केली. याप्रकरणी यवतमाळच्या तरुणाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणी ही बाहेरील जिल्ह्यातील आहे. तिच्याशी ४ वर्षापासून गावातीलच एका तरूणाची ओळख होती, नंतर त्यांच्यात प्रेमसंबंध झाले. तरूणी ही श्रीरामपूर येथे कोर्स करण्यासाठी आलेली असून ही तरूणी कॉलेजच्या आवारात असताना रोशन वाघ हा तेथे आला व त्याने तिला मोटारसायकलवर बसायला सांगितले.
पेपर चालू असल्याने तिने मोटारसायकलवर बसण्यास नकार दिला. तेव्हा रोशनने तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून शहरातील एका लॉजवर नेले.
तेथे रूममध्ये नेवून तू माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये का राहत नाही? तू माझ्यासोबत व्हॉटसअपवर का बोलत नाही? असे म्हणून त्याने तिला मारहाण करत तिचा मोबाईल घेवून बंद केला. त्यानंतर तिला बाहेर आणून मोटारसायकलवर बसवून बाभळेश्वरला नेले.
दरम्यान, मुलीचा फोन बंद असल्याने तिच्या वडीलांनी तेथील स्थानिक पोलिसांना कळवले. तेव्हा तेथील स्थानिक पोलिसांचा रोशन याला फोन आला. तेव्हा त्याने तरूणीला रात्री ८ वा. पोलिस स्टेशनच्या बाहेर सोडून दिले. तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रोशन वसंतराव वाघ याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.