बिबट्याची दहशत रोखण्यासाठी तरबेज नेमबाजांना बोलवले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरदिवशी बिबट्याचे मानवी वस्तीवर हल्ले होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यातच काल रात्रीच्या सुमारास शिर्डी मध्ये बिबट्याने मानवी वस्तीत येत एका कुत्र्याचा फाडशा पाडला आहे. तसेच पाथर्डी तालुक्यातील घटनेमुळे प्रशासनाने सदर बाब अत्यंत गंभीररीत्या घेतली आहे.

या घटनेनंतर नेतेमंडळींनी घटनास्थळी भेट देत कारवाईचे आदेश दिले आहे. तसेच नागरिकांना धीर देत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. यातच आता पाथर्डी तालुक्यातील नरभक्षक बिबटयाच्या शोध मोहिमेअंतर्गत राज्याच्या मोहिमेतील अनुभवी व विशेष कौशल्य नेमबजांना पाचारण करण्यात आले आहे.

वनविभागाच्या जिल्हास्तरीय मोहिमेचे केंद्र पाथर्डी झाले आहे. जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी तालुक्यात तळ ठोकुन शोधमोहिम यंत्रणेचे संचालन करीत आहे. दरम्यान गेल्या पंधरा दिवसात तालुक्यात तीन बालकांना बिबटयाने पालकासमक्ष उचलून नेउन ठार मारले या प्रकारामुळे ग्रामीण भागात भयंकर दहशत पसरली आहे.

याच घटनांना रोख लावण्यासाठी आज विशेष तज्ञांचे चार पथके नव्याने दाखल झाले आहे. जुन्नर, संगमनेर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बीड येथील पथके दाखल होताच त्यांनी तत्काळ शोध मोहिमेला सुरवात केली आहे. वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी साधन सामुग्रीसह तात्काळ रवाना झाले.

सर्च लाईट,नाईट मोड कॅमेरे, खोल दरित उतरण्यासाठी अत्याधुनिक ट्युब संच, बेशुद्ध करण्यासाठीच्या बंदुका व औषधे रेस्क्यु व्हॅन्स, अंगावर फेकण्यासाठीचे जाळे,लाठया काठ्या, सर्व प्रकारच्या अत्याधुनिक साधनसामुग्रीसह शहरातील हंडाळवाडी पासुन वृद्धेश्वर घाट परिसर व गर्भगिरी डोंगर रांगाचा निर्जन प्रदेश

या भागामध्ये सर्व कर्मचारी व अधिकारी विखुरले गेले आहेत. तालुक्यात ठिकठिकाणी सध्या १८ पिंजरे लावले असून आवश्यकतेनुसार पिंजऱ्याची संख्या वाढविण्यासाठी इतर जिल्ह्यातुन पिंजरे मागविण्यात आले आहेत.बिबटयाचे माग शोधणारी विशेष यंत्रणा यंदा प्रथमच वापरण्यात येत आहे.

या शोध मोहिमेत वास, पावलांचे ठसे,अन्यप्राणी व पक्षांच्या हालचाली,पक्षांचे विशिष्ट आवाज याचाही उपयोग केला जात आहे. ही घटना सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतली असुन नरभक्षक बिबट्या दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेशासाठी वस्तुस्थितीची गोपनीय पथकाकडून माहिती संकलित केली जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment