तहसिलदार ज्योती देवरे यांची कोरोना’वर मात !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- पारनेरच्या तहसिलदार ज्योती देवरे यांना कोरोनाची बाधा झाली होती. स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जाऊन रॅपिड चाचणी केली होती. तो अहवाल कोरोना पॉझिटिव आला होता.

काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांनी प्रकृती ठणठणीत आहे. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्या लवकरच कामावर रुजू होणार आहेत. काही दिवसापूर्वी कोरोना सदृश्य लक्षणे असल्याने देवरे यांनी रॅपिड किटच्या माध्यमातून चाचणी केली होती. अहवाल निगेटिव्ह आला होता.

त्यानंतर शासकीय लॅबच्या माध्यमातून घश्याचा स्राव देऊन चाचणी केली होती. तो ही अहवालही निगिटिव्ह होता. मात्र लक्षणे जाणवल्याने त्यांनी स्वतःहून हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार सुरू केले. पुन्हा रॅपिड चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव आला होता.

पारनेर तालुक्यातील प्रशासकीय काम करत असताना कोरोना रुग्णांच्या संपर्कात तहसीलदार देवरे आल्या होत्या. त्यांना यामुळे महिनाभरापूर्वी त्रासही झाला होता. त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली मात्र त्यांचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले. त्यावेळी उपचार करून त्या पुन्हा कामावर हजर झाल्या.

मात्र, पुन्हा आठ दिवसापूर्वी त्यांना त्रास जाणवत असल्याने तपासणी करून घेत येथील अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांनी खचून न जाता कोरोनाचा सामना केला. आता पूर्णपणे त्यावर मात केली आहे. तालुक्यातील जनतेने देखील आता कोरोना बाबत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

गरज नसेल तर घराबाहेर पडू नका सध्या कोरोनाचा संक्रमणाचा काळ आहे. संख्या अजून वाढू शकते त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीप्रमाणे त्याचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. काही दिवस त्या हॉस्पिटलमध्ये आहेत. खबरदारी म्हणून सुपा येथे डॉ. बाळासाहेब पठारे यांच्या ओंकार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

साडेचार महिने प्रशासकीय तालुक्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी अविरतपणे लढा दिला. चांगल्या उमेदीने काम करण्यासाठी आता पुन्हा सज्ज झाल्या आहेत. काम हेच कर्तव्य ब्रीद मानून तहसीलदार ज्योती देवरे यांनी गेल्या साडेचार महिन्यात एकही दिवस सुट्टी न घेता तालुक्यात कोरोना संदर्भात उपाययोजना राबवल्या आहेत.

बाधित परिवारातील सदस्यांची त्वरित चाचणीसाठी प्रयत्न केले तालुक्यात कुठेही कोरोना बाधित आढळला तर तहसीलदार या गावात येतील अशी अपेक्षा नागरिकांची बनली होती.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe