अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात वाळूतस्करांनी धुडगूस घातला आहे. वाढत्या वाळू तस्करीमुळे प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली आहे.
नुकतेच पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे वाळूचा अवैध साठा करून वाळू वाहतूक व भरणा करणारा पोकलेन, एक ट्रॅक्टर आणि मुरूमाची वाहतूक करणारा ढंपर तहसीलदार ज्योती देवरे यांनी पकडले.
तहसीलदार ज्योती देवरे, नायब तहसीलदार अविनाश रणदिवे, मंडलाधिकारी पवार, दत्ता गंधाडे, परमेश्वर राजुरे यांचे पथक फिरत असताना वासुंदे परिसरात एका ठिकाणी वाळूचा केलेल्या ढीग वरून पोकलेन च्या साह्याने ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी अशोक पाराजी वाळूंज, रा. काकणेवाडी याचाच पोकलेन व ट्रॅक्टर असल्याचे उपस्थितांनी सांगितले. शासकीय नियमानुसार पोकलेनला सात लाख रूपये व ट्रॅक्टरला दोन लाख रूपयांचा दंड होऊ शकतो. तर दुसरीकडे एका ढंपरने मुरूम वाहतूक करताना दिसला. तो ढंपर तहसीलदार देवरे यांनी पकडला.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved