तहसिलदारांच्या अंगावर डंपर घातलेल्या त्या वाळूतस्कर आरोपीस अखेर अटक !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-नदीपात्रातून चोरलेली वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर तहसिलदार ज्योती देवरे यांनी कारवाई करताच त्यांच्याच अंगावरच डंपर घालणाऱ्या आकाश कृष्णा रोहकले (वय २८ रा. भाळवणी) यास अखेर वर्षभरानंतर गजाआड करण्यात आले.

दि. २५ नोहेंबर रोजी मध्यरात्री तहसिलदार ज्योती देवरे यांनी “जलनेवालोंकी दुवाँ” से असे लिहिलेला राखाडी रंगाचा, टाटा कंपनीचा, एम एच १६ असा अपूर्ण क्रमांक असलेला, चोरीची वाळू भरलेला डंपर पकडला होता. या वाहनावर शासकिय कारवाई करण्यासाठी तहसिलदारांचे वाहन पाठलाग करीत असताना

आरोपी अक्षय दौलत पाडळे (वय २५ रा. हिंगणगांव ता. नगर), आकाश कृष्णा रोहोकले (वय २९ रा. भाळवणी, ता. पारनेर), व बापू बन्सी सोनवणे (वय २९ रा. हिंगणगांव ता. नगर) यांनी तहसिदारांच्या वाहनावर डंपर घालण्याचा प्रयत्न केला. डंपर धावत असतानाच त्यातील वाळू डंप करून तहसिलदारांच्या वाहनास अपघात होईल असे कृत्यही करण्यात आले.

त्यानंतर डंपर तेथून पसार झाला होता. तहसिलदार ज्योती देवरे यांनी तिघाही आरोपींविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र तिघाही आरोपींना पकडण्यात पारनेर पोलिसांना यश येत नव्हते तालुका दंडाधिकाऱ्यांच्या जिवितास धोका निर्माण करणारा फरार आरोपी आकाश कृष्णा रोहोकले

याने पारनेर पोलिस ठाण्याच्याच कर्मचाऱ्याचा वाढदिवस भाळवणीत मोठया थाटामाटात साजरा केला. त्यावेळी डीजेच्या तालावर तरूणाई देखील थिरकली. त्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मात्र पोलिस प्रशासनावर टिकेची झोड उठली होती. काही काळ टिका झाल्यानंतर मात्र या प्रकरणाची चर्चा बंद झाली होती.

नव्याने दाखल झालेल्या पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी मात्र या प्रकरणात लक्ष घालून वाळूतस्कर आकाश याच्या मुस्क्या आवळण्यात यश मिळविले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment