राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो पलटी; सुदैवाने जीवीतहानी नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात अपघातांचे सत्र सुरूच आहे. संगमनेर तालुक्यातील माहुली येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर मालवाहू आयशर टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली होती.

सुदैवाने या अपघातून टेम्पो चालक बालंबाल बचावला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, मालवाहू आयशर टेम्पो हा घारगावकडून संगमनेरच्या दिशेने जात होता.

मंगळवारी पहाटे हा टेम्पो खंदरमाळवाडी शिवारातील माहुली येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आला असता त्याच दरम्यान दुभाजकावर टेम्पो पलटी झाला.

मागे कोणतेही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला. तर केवळ दैव बलवत्तर असल्याने चालक बालंबाल बचावला आहे. या अपघातामध्ये टेम्पोचे मोठे नुकसान झाले असून मागील बाजूची चाकेही तुटली आहेत.

घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment