वाळूची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना रोख बसावा यासाठी पोलीस पथके सक्रिय झाली आहे. ठिकठिकाणी धाडसत्र, कारवाया सुरु करण्यात आलेल्या आहेत. यामुळे अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे.

नुकतेच अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणारा एक टेम्पो स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. देहरे (ता. नगर) टोलनाक्याजवळ पोलिसांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी टेम्पो चालक अनिल गंगाराम वाघमारे (रा. नांदगाव) याच्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत पोलिसांनी टेम्पो व एक ब्रास वाळू असा तीन लाख 10 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस शिपाई बंटी सातपुते यांनी फिर्याद दिली.

पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिंदे करीत आहे.