अहमदनगरच्या ‘त्या’ घाटात भीषण अपघात ; ट्रकने उडवली सात वाहने , २० ते २५ जण जखमी

Published on -

Breaking News : अहमदनगर – छत्रपती संभाजी महाराज महामार्गावरील पांढरी पुलाजवळ असलेल्या इमामपूर घाटात आज सायंकाळी भीषण अपघात झाला. अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका भरधाव वेगातील मालकने समोर चालेल्या तब्बल सात कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात तब्बल २०ते २५ जण जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, अहमदनगर – छत्रपती संभाजी महाराज महामार्गावरील पांढरी पुलाजवळ असलेल्या इमामपूर घाट आहे. या घाटात नेहमी अपघात होत असतात. या घाटात अवघड वळणे व तीव्र उतार आहे. तसेच पुढे पांढरी पुलावर गर्दी असल्याने या भागात अनेकदा अपघात होतात.

दरम्यान सोमवारी सायंकाळी अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एका मालकने घाट उतरत असताना समोर चाललेल्या सात कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे यातीळ अनेक कार थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकल्या गेल्या तर अनेक कारचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे.

या घटनेत २० ते २०५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आह. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच सोनई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दाखल केले तसेच या अपघातामुळे घाटाच्या दोन्ही बाजूंनी दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe