अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत.
यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे.
आता पुन्हा नव्याने कोपरगाव शहरातील कोर्ट रोड येथील बाधित डॉक्टरच्या संपर्कातील 12 अहवाल आज प्राप्त झाले असून 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
यामध्ये डॉक्टरचा मुलगा (34 वर्ष), सून (29 वर्ष) व पत्नी (60वर्ष) यांचा समावेश आहे. उर्वरित 9 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आता त्यांचा संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने सुरु केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा