अशी झाली अहमदनगर जिल्ह्यातील त्या मल्टीस्टेटमध्ये लाखोंची फसवणूक… धक्कादायक माहिती समोर !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-साई मल्ट्रीस्टेट को-ऑप अ्रॅग्रीकल्चर सोसायटी लि. शिरूर येथे अरविंद रामदास घावटे यांची ठेव पावत्या घेऊन त्यांच्या बनावट सह्या करून  त्यावर कर्ज काढून त्यांची ५२ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी साई मल्टीस्टेट चेअरमन, संचालक, मंडळ व्यवस्थापक यांच्यासह १४ जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरविंद रामदास घावटे (वय 36 वर्ष,  रा.रामलिंग घोटीमळा ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.  मात्र शाखाधिकार्‍याला हाताशी धरून घावटे यांनी गैरव्यवहार केला असल्याची माहिती साई मल्टिस्टेेटचे चेअरमन वसंत चेडे यांनी दिली आहे.

पारनेरमधील श्री साई मल्टिस्टेटने अरविंद घावटे यांच्या नावावरील ठेव पावत्यांवर 52 लाख रूपयांचे कर्ज काढून अपहार केला असल्याची फिर्याद शिरूर येथील अरविंद घावटे यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यात दिली. घावटे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संस्थेचे चेअरमन वसंत चेडे यांच्यासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हा गुन्हा राजकिय दबावापोटी दाखल करण्यात आल्याचे चेडे यांनी सांगितले. तसेच या गैरव्यवहारामध्ये संचालक मंडळाचा काहीही संबंध नसून शाखाधिकारी आणि घावटे यांचे लागेबंध असून त्या दोघांनी संगनमताने हा गैरव्यवहार केला आहे. श्री साई मल्टिस्टेटच्या 24 शाखांमध्ये आत्तापर्यत कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही.

त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जावू नये चेडे म्हणाले. शाखेमध्ये कामकाज करताना संचालक मंडळाचा कोणताही संबंध नसतो, तो शाखाधिकार्‍याचा असतो. नोव्हेंबर 2020 मध्ये शाखाधिकारी श्रीकांत झावरे यांनी बोगस सोने तारण दाखवून 18 लाख रूपये काढले.

त्यानंतर झावरेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे. एफर्ट प्रकरणी ‘या’ 14 जणांविरोधात गुन्हा दाखल या प्रकरणी वसंत फुलाजी चेडे , दत्तात्रय सहादु सोनावळे , अशोक फुलाजी चेडे,  गणेश रभाजी सांगळे, संदिप प्रभाकर रोहकले, उज्वला आप्पासाहेब नरोडे,

रेखा संतोश घोरपडे, इंद्रभान हरीभाउ शेळके,  विनायक सखाराम जाधव,  ज्ञानेश्वर बाळासाहेब औटी, राजेंद्र अमष्तलाल दुगड,  सुनिल अनंतराव गाडगे, प्रशाांत राजेंद्र बढे,  श्रीकांत पोपट झावरे (सर्व राहणार पारनेर तालुका अहमदनगर) यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे हे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment