७५ वर्षाच्या आजींने सांगितला कोरोनाशी लढण्याचा मंत्र

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोरोना विरुद्धची लढाई ७५ वर्षीय आजींनी यशस्वी जिंकली. मैनाबाई सुधाकराव ढुमणे असे आजीचे नाव आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यातील यशाचा मंत्र सांगताना आजी म्हणाल्या, कोरोनाशी लढताना मन खंबीर ठेवा,

शांत ठेवा, कोरोना झाला म्हणजे काही सगळे संपल नाही. निर्धाराने तोंड् द्या, तुम्ही नक्की बरे व्हाल. १८ जुलै रोजी ढुमणे आजींना श्‍वास घेण्याचा त्रास होवू लागला.

प्रचंड थकवा जाणवू लागला, भूक लागेना मग त्यांच्या मुलांनी दत्तात्रय व सुहास यांनी आजींची तपासणी केली. तर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला.

सगळा परिवार व स्नेही सगळेच हादरुन गेले. आजींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आजींना रक्तदाब, मधुमेह, ह्दयविकाराचाही त्रास त्यामुळे सर्वांनी अधिकच काळजी वाढली.

१८ जुलैला इस्पीतळात दाखल झालेल्या ढुमणे आजी २६ जुलैला कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतल्या. कुटुंबाने आणि शेजार्‍यांनी फटाके वाजवून व फुले उधळून आजींचे स्वागत केले.

त्यामुळे आजी भारावून गेल्या. हॉस्पिटलातील त्यांच्या लढ्याची माहिती देताना ढुणे आजी म्हणाल्या, दीपक हॉस्पिटलमध्ये मला अतिशय चांगले उपचार मिळाले.

माय टिफिन ने माझ्या जेवणाची उत्तम व्यवस्था केली. या काळात मी माझे मन काय खंबीर आणि शांत ठेवले. आणि सातत्याने नामस्रण ठेवले.

या सर्व उपायांमुळेच मी कोरोनावर मात करु शकले. घाबरू नका, खंबीर रहा, मन शांत ठेवा, तुम्ही नक्की कोरोनावर मात कराल.

स्वत:च्या नमाच्या खंबीरपणाबाबत हॉस्पिटल मधील आठ दिवसाच्या काळात माझ्या रुमधील शेजारील बेडवरील दोन पेशंट दगावले. पण मी त्याचा माझ्या मनावर काहीही परिणाम होवू दिला नाही.

आज त्यांचा ७५ वा वाढदिवस आहे. कालच कोरोनावर मात करुन त्या घरी परतल्या आहेत. कोरोनामुक्त नगर अभियानाचे प्रवर्तक व विकासवर्धिनीचे संचालक विनायक देशमुख यांनी श्रीमती ढुमणे आजींची सपत्नीक भेट घेवून

त्यांचे अभिष्टचिंतन केले. देशमुख यांच्या सवेत त्यांच्या पत्नी मंगल देशमुख, मुकूल देशमुख, दत्तात्रय व सुहास ढुमणे, पुजा ढुमणे, सुशात व स्वरा ढुमणे उपस्थित होते.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment