अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे यंदाच्या वर्षीचे सर्वच सणउत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदाचा नवरात्र उत्सव देखील अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन सरकारने केले आहे.
दरम्यान कर्जत तालुक्यामधील राशीनच्या जगदंबा देवीचा शारदीय नवरात्र उत्सव भाविकांशिवाय साध्या पध्दतीने पार पडणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा यात्राैत्सव रद्द करण्यात आल्याचा निर्णय कर्जत येथे झालेल्या प्रशासकीय बैठकित घेण्यात आला.
दरवर्षी प्रथेप्रमाणे साजरा होणारा जगदंबा देवीचा शारदीय नवरात्रोत्सव यंदा 17 ऑक्टोबर रोजी पासुन सुरू होत आहे.मात्र कोरोना संसर्गाचा काळ असल्याने हा उत्सव बंद दरवाजाच्या आत
साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन प्रांत अधिकारी अर्चना नष्टे यांनी केले. शासकीय नियमानुसार संचार बंदी लागू असल्याने मंदिर परीसरात कोणालाही येण्यास परवानगी नाही.
परिसरात पोलीस बंदोबस्त असणार आहे.नवरात्रातील देवीची पांरपारीक दैनदिंन पुजाअर्चा पुजारी यांचे हस्ते होईल. यंदा कोरोनाची पार्श्वभुमीवर श्रद्धा व सरकारी नियम यांचा मेळ घालून उत्सव पार पाडण्यास भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved