… अन ‘त्या’ रुग्णवाहिकेतून मृतदेह थेट पडला रस्त्यावर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : शहरातील बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मनपा यंत्रणा ते मृतदेह वारुळाचा मारुती परिसरात दफन करण्यासाठी नेते.

असाच एक अहमदनगर शहरातील एका व्यक्तीचा मृतदेह दफन विधी करण्यासाठी मनपा रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असताना रुग्णवाहिकेचा दरवाजा अचानक उघडला आणि मृतदेह थेट रस्त्यावर पडला.

हा रस्ता वर्दळीचा असल्याने अचानक ही घडल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार मंगळवारी घडला. दरवाजाचा नादुरुस्त असल्याने हा प्रकार घडल्याचे मनपा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

हा मृत करोनाचा की अन्य कोणता यावर बरीच चर्चा झाली. अखेर या बेवारस व्यक्तीचा मृत देह असून तो ठेकेदारामार्फत दफनविधीसाठी नेण्यात येत होता.

मात्र, रुग्णवाहिकेच्या दरवाजाची कडी खराब असल्याने दरवाजा उघडल्याने हा मृतदेह रस्त्यावर पडल्याचे मनपा आरोग्य विभागाने सांगितले.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment