इमारत बनली धोकादायक; कारवाईबाबत पालिका प्रशासन मात्र बेफिकीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-संगमनेर नगरपालिका प्रशासनाने 25 वर्षापूर्वी नविन नगररोडवर ही दुमजली इमारत उभी केली होती. नाल्यावर हे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधल्याने त्याला काही वर्षातच धोका निर्माण झाला आहे.

यामुळे नगरपालिकेने या इमारतीतील सर्व गाळेधारकांना गाळे खाली करण्यासंदर्भात वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी अंतिम नोटीस बजावून गाळे खाली न केल्यास कारवाई करण्यात येईल ,

असा इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला होता. मोठा कालावधी उलटूनही एकाही गाळेधारकाने इमारत खाली केलेली नाही. संगमनेर शहर विकसीत होत असताना नविन नगररोडवर हे व्यापारी संकूल बांधण्यात आले.

25 वर्षांपूर्वी अवघ्या 30 ते 60 हजारांत अनेक गाळेधारकांनी हे गाळे ताब्यात घेतले. नंतरच्या काळात नविन नगररोड हा परिसर शहरातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण बनले. यामुळे या गाळ्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या.

अनेक गाळेधारकांनी 25 ते 30 लाख रुपयांना हे गाळे अन्य व्यवसायीकांना हस्तांतरीत केले. या ठिकाणी व्यवसाय तेजीत असल्याने हे गाळे खाली करण्यासाठी कोणीही धजावत नाही.

इमारत धोकेदायक बनल्याने नगरपालिकेने नोटीस दिली होती. मात्र दोन महिन्यांनंतरही कारवाई न केल्याने पालिका प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

इमारत खाली करायची नव्हती तर गाळेधारकांना अंतिम नोटीस का बजावली? असा संतप्त सवाल शहरातील नागरीकांमधून विचारला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment