अहमदनगर Live24 टीम, 9 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
यातच बहुतांश वेळा महिलांवरील होणारे अत्याचाराच्या घटना त्यांच्या परिचित व्यक्तींकडूनच झालेल्या आढळून आल्या आहेत.

नुकतेच शहरातील सार्वजनिक स्थळावर महिलेसोबत छेडछाडीची घटना घडली आहे. दरम्यान महिलेची छेडछाड करणार्या एसटी वाहकाला नागरिकांनी माळीवाडा बसस्थानकात चांगलाच चोप दिला.
याबाबत अधिक माहिती अशी कि , सादर पीडित महिला श्रीगोंदा बसस्थानकातून नगरकडे येण्यासाठी श्रीगोंदा-त्रिंबकेश्वर या बसमध्ये बसली. एसटी वाहक त्या महिलेशी अश्लिल चाळे करु लागला.
सदर महिलेने ही बाब गावातील नागरिकांना फोन करुन सांगितली. नागरिकांनी बस माळीवाडा बसस्थानकात येताच त्या वाहकांला चांगलाच चोप दिला.
नागरिक ऐवढेच करुन थांबले नाही तर त्या वाहकाला अद्दल घडविण्यासाठी थेट पोलिस ठाणे गाठले व पोलिसांच्या हवाली केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved