अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : कायम प्रसंगावधान राखणाऱ्या या चालकाने येथेही प्रसंगावधान राखत थेट विलगीकरण कक्ष गाठला होता. मात्र त्यांना पोटाचा त्रास असल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी जाताना त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत दोघांनी प्रवास केला.
शिवाय एकजण त्यांना भेटण्यासाठी गेला. मात्र येथे या व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण भावीनिमगाव गाव दि.२९ जूनपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे.
गावातील अत्यावश्यक सेवेसह सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या असून गावात ये-जा करण्यास बंदी घातली आहे. वैद्यकीय पथकाद्वारे गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
सदर कोरोनाबाधित व्यक्ती एसटी बस चालक आहे. कायम प्रसंगावधान राखणाऱ्या या चालकाने येथेही प्रसंगावधान राखत थेट विलगीकरण कक्ष गाठला होता.
मात्र त्यांना पोटाचा त्रास असल्याने येथून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी जाताना त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत दोघांनी प्रवास केला.
शिवाय एकजण त्यांना भेटण्यासाठी गेला. तिघेजण नगरहून पुन्हा गावातील विलगीकरण कक्षात दाखल झाले असा अहवाल दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कानडे व डॉ.सुमित श्रावणे यांनी तहसीलदार यांना दिला. त्यामुळे या तिघांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews