अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-कर्जत कुळधरण रस्त्यावर सद्गुरु डेअरीसमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका चार चाकी वाहनाचा अपघात झाला.
मात्र सुदैवाने यातील पाचही व्यक्ती सुखरूप बचावल्या, किरकोळ जखमी झाल्याने त्यांच्यावर कर्जत येथे उपचार करण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा कुळधरणकडून क्रेटा ही चार चाकीगाडी (एमएच ४२ एएच १६१७) कर्जतकडे येत होत. दुपारी ४ च्या सुमारास सद्गुरू डेअरीसमोर सदर गाडी आली असता,
खराब रस्त्यामुळे व रस्त्यावरील कचमुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडीने दोन पलटी मारल्या व गाडी दहा फूट खोल खड्ड्यात पालथी जाऊन पडली.
या गाडीत सुनील रामभाऊ घाडगे (इनामगाव ता.शिरूर वय ४०) हे गाडी चालवत होते तर त्याचे बरोबर त्याचे कुटुंबीय सुरेखा सुनील घाडगे (वय ३५), राज सुनील घाडगे (वय १३),
हर्षवर्धन सुनील घाडगे (वय १८), प्रथमेश जगदाळे (वय १८ रा.दौड), हे सर्वजण गाडीत अडकले होते. या सर्वांना काचा तोडून बाहेर काढले, कर्जत येथील खाजगी दवाखान्यामध्ये त्याच्यांवर उपचार सुरू आहेत.
यातील सुरेखा, हर्षवर्धन व राज यांना गंभीर मार लागला आहे. कर्जत कुळधरण रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू असून, गेली पंधरा दिवसात चार चाकी वाहनाचा हा पाचवा अपघात आहे. दुचाकी वाहने तर दररोजच घसरत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved