त्या’ रुग्णाच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच ? कुटुंबातील पाचजण होमक्वारंटाईन!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :संगमनेर तालुक्यातील कुरण येथील एका ५० वर्षीय रुग्णाला जिल्हा रुग्णालयात पाठविले होते. मात्र, तेथे दाखल होण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार मृताचा घशातील स्राव घेता येत नाही.

त्यामुळे रुग्णाच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात राहिले असून, प्रशासनाने खबरदारी म्हणून या रुग्णाच्या कुटुंबातील पाच जणांना होमक्वारंटाईन केले आहे.

कुरण येथील एकाची प्रकृती बिघडल्याने शहरातील खासगी रुग्णालयात नेले. तेथून रुग्णास घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र, नातेवाइकांनी रुग्णाला थेट नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविले.

या दरम्यान रुग्णाची प्रकृती अधिकच खालावली व रुग्णालयात पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कोरोनाच्या कठीण काळात, मृताचा स्राव तपासला जात असे.

मात्र, शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, मृताचा स्राव घेण्यास बंदी आली. त्यामुळे मृतदेह त्याच रुग्णवाहिकेतून परत पाठविल्याचे समजते. संगमनेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत, शासकीय आदेश येईपर्यंत मृतावर अंत्यसंस्कार थांबविले.

निमोण प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक व महसूल यंत्रणा कुरणला पोचली. मोजक्‍या व्यक्तींच्या उपस्थितीत दफनविधी झाला.

स्राव घेण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्याने, मृत्यूचे कारण गुलदस्त्यातच राहिले असले, तरी प्रशासनाने सावधगिरीचा उपाय म्हणून रुग्णाच्या कुटुंबातील पाच जणांना होम क्वारंटाईन केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment