चर्मकार समाजाने जनमानसात बंधुभाव जोपासण्याचे कार्य केले -खासदार लोखंडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-चर्मकार समाजाने विविध उद्योग व्यवसायासह विकास करताना जनमानसात बंधुभाव जोपासण्याचे कार्य केले. समाज संत रविदास महाराजांच्या विचार घेऊन पुढे जात असल्याचे प्रतिपादन खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले.

चर्मकार विकास संघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी मार्गदर्शन शिबीर नुकतेच शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे पार पडले. या शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी खासदार लोखंडे बोलत होते. प्रारंभी दीप प्रज्वलन करुन व संत रविदास महाराज यांच्या आरतीने शिबीराचे उद्घाटन झाले.

या शिबीरात राज्यातून पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खासदार लोखंडे पुढे म्हणाले की, संजय खामकर यांच्या नेतृत्वाखाली चर्मकार विकास संघाने राज्यस्तरीय पदाधिकारी यांचे शिबिर आयोजित करून कार्यकर्त्यांना दिशा देण्याचे कार्य केले आहे.

विविध विषयांचे तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून कार्यकर्ता घडतो व कार्यकर्त्यांमधून नेता घडत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चर्मकार समाजातील बांधवांचे प्रश्‍न शासनस्तरावर सोडविण्यासाठी कटिबध्द असून, मुंबईत चर्मकार समाजाचे वसतीगृह व प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अखिल भारतीय रविदास इय धर्म संघटन भारत तिसरी धर्म स्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवजी महाराज यांनी संत रविदास महाराज यांनी समाजातील विषमता, अंधश्रंध्दा, कर्मकांड दूर करण्यासाठी जनजागृतीचे कार्य केले. त्यांचे विचार व कार्य सर्व समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.

व्याख्याते विठ्ठल बुलबुले यांनी माहितीच्या अधिकारा विषयी उपस्थित युवकांना सविस्तर मार्गदर्शन करून, माहितीचा अधिकार कसा व कधी वापरावा? या विषयी माहिती दिली. कॉ. अनंत लोखंडे यांनी शाहु, फुले, आंबेडकर विचारांनी कार्यकर्त्यांनी अचारसंहिता व अनुशासन पाळून समाज हिताचे कार्य करण्याचे आवाहन केले.

कायदेविषयक मार्गदर्शन करताना अ‍ॅड. नारायण गायकवाड यांनी दलित समाजावर होणार्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी तरुण युवकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. तर अनुसूचित जाती अंतर्गत कायदा व संरक्षण हक्क कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अ‍ॅड. विजयकुमार सरोदे यांनी वाहन संरक्षण व अपघात विषयी कायद्याची माहिती दिली.

चर्मकार विकास संघाचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी समाजाने एकत्रीतपणे येऊन विकास, न्यायहक्क व सन्मानासाठी लढण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. तर कोरोना महामारीत समाजातील दानशूर व्यक्तीमत्वामुळे टाळेबंदीत दहा हजारपेक्षा जास्त गरजू कुटुंबांना संघटनेच्या माध्यमातून मदत करुन आधार दिल्याचे सांगितले.

मुंबई विभाग प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे यांनी प्रास्ताविकात संघटनेची माहिती दिली. प्रदेश सचिव प्रा.सुभाष चिंधे यांनी संघटनेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी अभिनेते काळुराम ढोबळे, रामदास सोनवणे, कारभारी देव्हारे, हरिभाऊ बावस्कर,

दिनेश देवरे, स्वाती सौदागर, प्रतिभा खामकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश माने (मुंबई), अध्यक्ष प्रियांका गजरे (पुणे), कार्याध्यक्ष महेंद्र साळवे, निलेश झरेकर, सयाजी पवार, संतोष कांबळे, अमर झिंजुर्डे, शिवाजी पाचोरे, वैभव खैरे, निलेश आंबेडकर, संजय गुजर, अमोल डोळस, संदीप डोळस, सिमोन जगताप,

अ‍ॅड. शेजवळ, निलेश साबळे यांनी शिबीराचे व्यवस्थापन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी जगन्नाथ खामकर, अशोक बोर्हाडे, संगिता वाकचौरे, वंदना कांबळे-गोरख वाघमारे, किरण घनदाट, संतोष लोहकरे,

विनायक कानडे, संतोष खैरे, वैभव खैरे, आण्णा खैरे, दत्तात्रय खामकर, विशाल पोटे, रंगनाथ कानडे, विवेक झरेकर, अमोल वाघमारे, रविंद्र सातपुते, संजय बनसोड, दत्तात्रय ढवळे,अनुराधा पाचरणे, सचिन उसरे, अशोक वाघमारे, अ‍ॅड. अविनाश शेजवळ आदींनी योगदान दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe