अंत्यविधीसाठी आला भलताच मृतदेह ! पत्नी म्हणाली ‘ये मेरा दुल्हा नही है

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- संगमनेर शहरातील मध्यवर्ती भागातील उपनगरात एक धक्कादायक प्रकार घडला. कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.

परंतु अंत्यविधीवेळेस तो मृतदेह भलताच कोणाचातरी असल्याचे पत्नीच्या लक्षात आले. आणि मग मात्र त्यांनतर प्रशासनाची भलतीच धावपळ उडाली. अखेर हा मृतदेह पुन्हा नगरला पाठविण्यात आला.

याचे झाले असे, या भागातील कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान अहमदनगर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर मोजकेच नातेवाईक नगर येथे गेले.

सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनाने मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. परंतु कोरोनामुळे त्याचा चेहरा झाकून ठेवण्यात आला असल्याने नातेवाइकांनी त्याचा चेहरा न पाहताच मृतदेह ताब्यात घेत संगमनेरला आणला.

मात्र समाजाच्या रितीनुसार पत्नीला पतीचा चेहरा दाखविण्यात येतो, याप्रमाणे सदर व्यक्तीचा चेहरा त्याच्या पत्नीला दाखवण्यात आला.

हा चेहरा पाहताच तिला आश्चर्याचा धक्का बसला. ‘ये मेरा दुल्हा नही है, ये कौनसी बॉडी लायी है’ असा सवाल महिलेने करताच प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर हा मृतदेह पुन्हा नगरला पाठविण्यात आला.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe