अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- सासरच्या व्यक्तिनाच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने स्वतःला संपविले असल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. विशेष बाब म्हणजे अवघ्या अडीच महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला होता.
सुखी संसाराची स्वप्ने रंगण्यापूर्वीच तिचे आयुष्य बेरंग होऊन गेले. दरम्यान याप्रकरणी मयत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली असून पतीसह चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विवाहितेचे वडील तुकाराम किसन बोंद्रे (रा.वरुडी बुद्रुक ता. पैठण) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, माझी मुलगी सुरेखा हिचे 17 डिसेंबर 2020 रोजी शरद रामकिसन थोरे (रा. पाथरवाला ता. नेवासा) याचेशी लग्न झाले.
सासरच्या व्यक्तींनी 28 जानेवारी रोजी माझ्या मुलीस माहेरीही आणून सोडले. त्यानंतर रात्री सुरेखा हिने मला व माझी पत्नी सखुबाई हिस सांगितले की, पती शरद थोरे, सासरे रामकिसन थोरे,
सासू शोभा थोरे, भाया ज्ञानेश्वर थोरे हे ट्रॅक्टरसाठी दोन नव्या ट्रॉल्या घेण्यासाठी माहेरून अडीच लाख रुपये आणावेत यासाठी मारहाण व मानसिक छळ करत आहेत.
पिकाचे पैसे आले कि पैसे देतो असे सांगितल्यावर सासरच्या व्यक्तींनी विवाहितेला घेऊन गेले मात्र 1 मार्च रोजी सकाळी सासरे रामकिसन थोरे यांनी फोन करून तुमची मुलगी आजारी असल्याचे सांगून मला बोलवून घेतले.
दरम्यान मुलीच्या घरी गेलो असता तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. तिचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविला.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|