अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व ते प्रयत्न करीत आहे, सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे.
सर्व हॉटेल आणि लॉजेस बंद ठेवण्याचे आदेश आसतांना आय्याशी करण्यासाठी जोडप्यांना शिर्डीतील लॉजेसची आठवण येवू लागली आहे.
असाच एक प्रकार पुन्हा येथे घडला आहे. शासनाची परवानगी नसतांना जिल्हाधिकारी यांचे आदेश झुगारून निमगाव शिवारातील हॉटेल शीतल येथे एका जोडप्यास खोली भाडोत्री देण्यात आली होती.
अशा पद्धतीने बेकायदेशीर खोली भाडोत्री दिल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या हाँटेलवर छापा टाकला. तर त्याठिकाणी अय्याशी करण्यास आलेले जोडपे मिळून आले आहे.
शिर्डी पोलिस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरिक्षक दिपक गंधाले आणि पोलीस निरिक्षक बारकू जाणे यांनी त्या जोडप्याकडे कसून चौकशी केली असता
कोपरगाव येथील शिवाजीनगर भागातील असल्याचे सांगीतले. 30 वर्षीय पुरुष आणि 23 वर्षीय युवती यांनी ही खोली भाडोत्री घेतल्याचे निष्पण झाल्यानंतर पोलीसांनी हॉटेल चालक भाऊसाहेब जगताप,
मॅनेजर विशाल पाटील बरोबरच कोपरगाव येथून आलेले ग्राहक सागर अशोक गवारे आणि सोबतची युवती यांच्यावर जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews