कोरोना महामारीत राजकीय व सामाजिक व्यक्ती गेल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्ष कार्यालयात फिजीकट डिस्टन्स व नियमांचे पालन करुन शोभसभा घेण्यात आली.

यावेळी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस स्व.सोमनाथ धूत, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब गाडळकर, हनीफ जरीवाला, शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, मुरलीधर शिंगोटे, पांडूरंग रायकर, शारदाताई टोपे,

प्रदिप गांधी, दिगंबर ढवण, माणकचंद बोथरा, मुस्ताक पटेल, हिरामन गंगुळे, यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक व्यक्तींना श्रध्दांजली वाहण्यात आली.

ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या शोकसभेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, घनश्याम (आण्णा) शेलार, संजय कोळगे,

अविनाश आदिक, अभिजित खोसे, अंबादास गारुडकर, अतार शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्राजक्त तनपुरे म्हणाले की,

कोरोनाच्या महामारीत अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती गेल्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

पक्षाचे पदाधिकारी देखील गमावल्याचे दु:ख होत असून, पक्षाची मोठी हानी झाली आहे. कोरोनाच्या या संकटकाळात सर्व नियम पाळून प्रत्येकाने काळजी घेतल्यास

हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्वर्गीय व्यक्तींच्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment