शहराच्या विकासाला चालना देणे आवश्यक आहे – माजी आमदार शिवाजी कर्डिले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- पद मिळाल्यानंतर कोणीही हवेत न जाता पदाला साजेसे काम करून जनतेचा विश्वास संपादन करावा.

नगर शहराच्या विकासाला चालना देऊन आगामी कालावधीत मनपात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन भाजप नेते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले.

नगरसेवक मनोज दुलम यांची सभागृह नेतेपदी निवड झाली. त्यांचा सत्कार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपचे शहराध्यक्ष भय्या गंधे, सुवेंद्र गांधी, सभापती मनोज कोतकर, महिला व बालकल्याण सभापती लता शेळके, नगरसेवक रामदास आंधळे,

उदय कराळे आदी उपस्थित होते. कर्डिले म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांनी पदाच्या माध्यमातून शहराच्या विकासाला चालना देणे आवश्यक आहे.

पक्ष वाढवण्यासाठी विकासकामांतून जनतेचा विश्वास संपादन करावा. मनपाच्या पुढील निवडणुकीत स्वबळावर भाजपची सत्ता आणावी. दुलम हे सामान्य कुटुंबातील आहेत. काम करणाऱ्यांना पक्षात पदाच्या माध्यमातून समान न्याय दिला जातो, असे कर्डिले यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe