अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाल्या आहेत. याच रणधुमाळीत देशात प्रसिद्ध असलेल्या राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या दोन गावांत ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत.
दरम्यान पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार येथे तब्बल 30 वर्षांनी ग्रामपंचायत निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ही निवडणूक लढवत असणार्या परिवर्तन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांना जीवाची भीती वाटते, असे निवेदनच परिवर्तन ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हिवरेबाजार गावच्या 2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीकरिता आम्ही स्वतंत्र पॅनल उभा केला म्हणून आम्हाला फारमोठ्या प्रमाणात राजकीय विरोध सुरू झाला आहे.
त्यातूनच आम्हास धमकावले जात आहे. तसेच आमच्या प्रचारामध्ये अडथळा निर्माण करण्याची दाट शक्यता आहे. तसेच गावामध्ये निवडणुकीच्या दरम्यान राजकीय वाद उपस्थित करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होण्याची दाट शक्यता आहे.
कार्यक्रमामध्ये व निवडणूक झाल्यानंतर सरपंच, उपसरपंच निवडणूक होईपर्यंत पोलीस संरक्षण मिळणे आवश्यक व गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved