अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : आमदार नीलेश लंके यांनी सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून विकासात्मक व आरोग्याच्या दृष्टिकोनाने कामे चालू आहेत. कोरोनाला न घाबरता
त्याचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करून व नियमांचे पालन करून ही महामारी हद्दपार करावी, असे आवाहन आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पारनेर विधानसभा मतदारसंघात आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या पुढाकाराने नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी
होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांच्या वाटपाचे उपक्रम सुरू आहे. आदर्श गाव हिवरे बाजार येथील ग्रामस्थांना होमिओपॅथीचे आर्सेनिक गोळ्यांचे वाटप झाले.
त्यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी आमदार नीलेश लंके, डॉ. प्रमोद लंके आदी उपस्थित होते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने आमदार नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण पारनेर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेले होमिओपॅथीचे आर्सेनिक गोळ्या वाटपाचे उपक्रम कौतुकास्पद असल्याची भावना पद्मश्री पवार यांनी व्यक्त केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews