सहकार क्षेत्रातील बड्या नेत्याचे कुटुंब कोरोनाबाधित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण वाढत चालले आहे. कोपरगाव तालुकाही याला अपवाद राहिलेला नाही. 

काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु पुन्हा कोरोनाने या ठिकाणी आपले पाय रोवले आहेत.

सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या एका बड्या नेत्याच्या कुटूंबातील 4 सदस्यांना घरातील एका कामगारामुळे कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे.

संबधीत नेत्याने स्वतःसह इतरांच्या जीवाला धोका होवू नये यासाठी संपूर्ण  कुटुंबातील सदस्यासह संपर्कातील व्यक्तींची कोरोना तपासणी खासगी प्रयोगशाळेत करून घेतली.

त्यात कुटुंबातील मुलगा, सुन व 2 नातवंडे बाधीत आढळले. प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करीत त्यांनी आपले सर्व कामकाज बंद ठेवून क्वारंटाईन करून घेतले आहे तर ते राहत असलेला परिसर प्रशासनाने सील केला आहे.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment