अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाहत चालले आहे. अहमदनगर शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक जास्त आहे. जिल्ह्यात २१ हजारांच्या पुढे रुग्णसंख्या गेली आहे.
त्यापैकी १० हजारांच्या आसपास रुग्णसंख्या शहरामधील आहे. नालेगाव, तारकपूर, भूतकरवाडी, खिस्तगल्ली, कोठी रोड या भागात फॅमिलीतील मेंबर बाधित असल्याचे समोर आले आहे.
कोरोनाने सर्वसामान्यांबरोबर नेते मंडळीही आपल्या कवेत घेतली आहे. आता नगर शहरात एक नगरसेवक व त्यांच्या फॅमिलीतील तब्बल आठ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
याच नगरसेवकाच्या परिसरातील माजी नगरसेविका असलेल्या महिलेलाही कोरोना झाला आहे. घरात एखाद्याला कोरोनाची बाधा होत होती, आता फॅमिलीची फॅमिलीच बाधित होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महापालिकेत नेतृत्व केलेल्या एका माजी नगरसेवकाची पत्नीही बाधित निघाली आहे. या अगोदर कोरोनाची बाधा झाली होती. आता पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला. पत्नीनेही काही काळ महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे.
वाढती रुग्णसंख्या पाहता सर्वानी प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावेत , गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, सोशल डिस्टन्स पालन करावे, मास्क वापरावे असे आवाहन करण्यात येत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved