अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-शेवगाव तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार असून ३७७ उमेदवार रिंगणात आहेत. शेवगाव तालुक्यातील ‘या’ गावांमध्ये निवडणुका रंगणार ठाकूर पिंपळगाव, बक्तरपूर, निंबेनांदूर, मजलेशहर, शेकटे बु., लखमापुरी, सुकळी, कोळगाव, हसनापूर, सोनविहीर, शिंगोरी, कोनोशी, अधोडी, खुंटेफळ, बोडखे,
दादेगाव, ताजनापुर, गायकवाड जळगाव, कांबी, वाडगाव, नागलवाडी, सुलतानपूर बु., भावीनिमगाव, भातकुडगाव, नविन दहिफळ, जुने दहिफळ, राणेगाव, अंतरवाली बु., अंतरवाली खुर्द, चेडेचांदगाव, ढोरजळगावने, आखतवाडे, तळणी, दहिगावशे, गदेवाडी, हातगाव, ढोरजळगावशे, आव्हाणे खुर्द, बेलगाव, चापडगाव, घोटण,
मळेगावशे आदी गावात निवडणूक होणार आहे. एका मतदान केंद्रावर चार मतदान अधिकारी, एक शिपाई, एक पोलीस असे एकूण सहा कर्मचारी राहणार आहेत.
१८ फिरते पथक, मतदान यंत्रात काही तांत्रिक अडचण आली तर त्यासाठी २६ यंत्र राखीव ठेवण्यात आले आहेत. ८ झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण १५२ मतदान केंद्र असून ७६० अधिकारी व कर्मचारी आदी यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved