खोटे मेसेज पाठवून फसवणूक करणारी टोळी गजाआड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- क्युआर कोड वापरून ई-पेमेंट केल्याचा खोटा मेसेज दाखवून दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

संजय अशोक सोनार, शुभम भगवान सोनवणे, रवी उत्तम पटेल, राजू श्रीहरीलाल गुप्ता (भोसरी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून २ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नगर-सोलापूर रोडवरील सिद्धी पेट्रोल पंप येथे ८ नोव्हेंबरला एका कारमधून चार जण आले.

त्यांनी तीन हजारांचे पेट्रोल भरले. ऑनलाइन पेमेंट करतो, असे सांगून पंपावरील क्युआर कोड स्कॅन केला. ऑनलाइन पेमेंट झाल्याचा मेसेज पंपावरील व्यवस्थापकाला दाखवला. व्यवस्थापक प्रमोद खरे यांनी खाते चेक केले असता पैसे जमा झाले नसल्याचे निदर्शनास आले. स्था

निक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना माहिती मिळाली की, दरेवाडी शिवारात आरोपी फिरत आहेत. ती कार दिसताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

रांजणगाव गणपती येथे एका फुटवेअरमध्ये, माळीवाडा व पुणे जिल्ह्यातील कारेगाव भागात मोबाइलच्या दुकानात अशाच पद्धतीने खरेदी केल्याचे आरोपींनी सांगितले. दोन मोबाइल, विविध कंपन्यांचे बूट व सँडल, कार पोलिसांनी जप्त केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment