आमदार लंके यांच्या मध्यस्थीमुळे हजारे व महाविकास आघाडीत निर्माण झालेली दरी दूर !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या कार्यपध्दतीवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.

याच पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे शुक्रवारी भेट घेतली.

ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह लोकसहभागातून ग्रामविकास व समृद्ध खेडी या विषयांवर यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली.

या भेटीनंतर आपले निम्मे समाधान झाले आहे, अंमलबजावणीनंतर निम्मे होईल असे हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यामुळे अण्णा हजारे आणि आघाडी सरकार यामध्ये निर्माण झालेली दारी जराशी दूर झाल्याचे चित्र आहे.

आ. लंके यांच्या मध्यस्तीमुळे हे शक्य झाल्याची चर्चा आहे. कारण या पार्श्वभुमीवर मंत्री मुश्रीफ यांच्या दौर्‍याच्या निमित्ताने आ. लंके यांनी सकाळी हजारे

यांची राळेगणसिद्धीत भेट घेत मुश्रीफ यांची भेट घेण्यासंदर्भात हजारे यांचे मन वळविण्यात यश मिळविले व दुपारी मुश्रीफ व हजारे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.

लंके यांच्या मध्यस्थीमुळे हजारे व महाविकास आघाडीत निर्माण झालेली दरी दूर होण्यास मदत झाली असेच म्हणावे लागेल.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News