कारच्या धडकेत युवतीचा मृत्यू,कारचालक कारसह पळून जाण्यात यशस्वी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे काल सकाळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पल्लवी विलास राहाणे (वय १९ वर्षे) या कॉलेज तरुणीचा मृत्यू झाला.

खंडाळा येथील उक्कलगाव रस्त्यालगत रहिवासी असलेले विलास मुरलीधर राहणे यांची पल्लवी ही मुलगी होती. दत्तनगर- खंडाळा दरम्यान असणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ती डिझायनर हा कोर्स करत होती.

रोजच्याप्रमाणे ती सायकलवर जात असताना श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावर सद्गुरु लॉन्स ते गडाख सव्र्हीस स्टेशनदरम्यान सकाळी साडेनऊ वाजता हा अपघात झाला.

पल्लवी दत्तनगरच्या दिशेने जात होती, त्यावेळी बाभळेश्वरकडून येणाऱ्या कारने तीला धडक दिल्याची चर्चा घटनास्थळी होती.

कारचालक कारसह पळून जाण्यात यशस्वी झाला. पल्लवी हीस कामगार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment