सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा; माजी आमदारांनी केली मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- शेतकरी, कर्जमाफी, अनुदान, या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच आरोप – प्रत्यारोप सुरूच असतात. यातच माजी आमदार शिवाजी कर्डीले याची राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना कर्डीले म्हणाले कि, भाजप सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा भाजप सरकारने शेतकऱ्यांना विविध योजनेमार्फत मदत केली. केंद्र व राज्य सरकारने मिळून मोठी कर्जमाफी केली.

यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरी या तीन पक्षाच्या सरकारने लवकरात लवकर पिकांचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.

या अतिवृष्टीमुळे नगर जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शिवाजी कर्डीले यांनी केली आहे. देशभर कोरोनाचे संकट असतांना

देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये आर्थिक मदतीचा लाभ दिला. तसेच नगर जिल्ह्याला सुमारे १ हजार ४५० कोटी रुपयांची कर्जमाफी झाली.

कोरोना संकटाच्या काळामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खेळते भांडवल म्हणून आर्थिक मदत अकोळनेर, मांडवे, नारायणडोह, उक्कडगाव, चास, भोयरे पठार यांना सुमारे १२ कोटींपर्यंत कर्ज वाटप करण्यात आले,

असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या वतीने अकोळनेर, नारायण डोह ,चास, भोयरे पठार व उक्कडगाव येथील शेतकऱ्यांना खेळते भांडवलचा चेक वाटप करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले बोलत होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment