सचिन वाझे यांच्याबाबत सरकारने घेतला ‘मोठा’ निर्णय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरुन सध्या विरोधकांनी टार्गेट केलेले पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची क्राइम ब्रांचमधून बदली करुन दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत केली आहे.

विधानपरिषदेत गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझेंची बदली होणार असल्याची घोषणा केल्यानंतरही विरोधकांचा गदारोळ कायम होता. बदली नाही तर निलंबन करुन अटक करा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे.

गृहमंत्री देशमुख यांनी निवदेनाच्या सुरुवातीला राज्यातील गुन्हेगारीची आकडेवारी दिली. मात्र यावरुन विरोधकांनी गदारोळ घालत सचिन वाझेंवर काय कारवाई करणार आहे अशी विचारणा करत त्यावर बोलण्याची मागणी केली.

अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले की, “सचिन वाझेंवर नियमानुसार कारवाई होईल. सध्या क्राइम ब्रांच जिथे ते कामाला आहेत तिथून हलवून दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्यात येईल”.

निष्पक्षपणे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले. सचिन वाझे प्रकरणावरुन वातावरण संतप्त आहे.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनी पतीचा खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रथमदर्शनी अनेक पुरावे समोर येत आहेत.

विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी पत्नीचा जबाब सांगितला तरी सरकार सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe