अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे राज्यातील मंदिरे अद्यापही खुली करण्यात आलेली नाही आहे. लवकरच याबाबर निर्णय घेण्यात येणार असून लवकरच मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहे.
देवाच्या दर्शनासाठी भक्तही आतुर झाले आहे. मात्र या संकटामुळे घरी बसून आहे. जिल्ह्यातील नावाजलेले व देशभर ख्याती असलेले शनीशिंगणापूर येथील स्वयंभू शनिमुर्तीचे दर्शन सेवाही बंद आहे.
कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात विश्वस्त मंडळाने १७ मार्च २०२० रोजी दर्शनासाठी मंदीर बंदचा निर्णय घेतला होता. सुरुवातीचे काही महिने सर्वच हा नियम पाळत होते.
मात्र काही दिवसांपासून काही विश्वस्त आपल्या मर्जीतील भाविकांना घेवून त्यांचे खास दर्शन करुन घेत आहेत. ही पध्दत पाहून काही कर्मचारी आरतीचे लाइव्ह शनिदर्शन काही भाविकांना मोबाईलच्या व्हिडिओ काॅल द्वारे घडवू लागले.
या सर्व प्रकाराने ग्रामस्थ व परीसरात नाराजी व्यक्त होत आहे. देवस्थान प्रशासनाने मुख्य दरवाजा जवळ एक स्क्रीन लावून भाविकांसाठी बाहेरूनच दर्शन सुरु केले आहे.
या निर्णयाचे अनेक भाविकांनी कौतुक केले. देवस्थानचे विश्वस्त, अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त मंदिरात कुणालाही प्रवेश द्यायचा नाही. असे विश्वस्त मंडळ बैठकीत ठरले असताना चोरुन-लपून होत असलेल्या दर्शनाची चर्चा होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved