ग्रामपंचायत आरक्षण सोडतबाबत पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. निवडणुकीच्या अगोदर सरपंचपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं.

मात्र निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने हे आरक्षण रद्द करत निवडणुकीनंतर आरक्षणाची सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान आज राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यामुळे आता सरपंच, उपसरपंच निवड प्रक्रियाही लवकरच होणार आहे. सरपंच पदासाठी आरक्षण सोडत अद्याप निश्चित होते बाकी आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदाचं आरक्षण काढू, असं वक्तव्य केलं आहे. पुढच्या एक महिन्यात हे आरक्षण काढलं जाईल, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

ते कोल्हापुरात बोलत होते. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच्या सोडतीवर सविस्तर भाष्य केलं.

तसंच राजकीय फटकेबाजीही केली. नेत्यांनी पहिल्यांदा आपली गल्ली सांभाळायला पाहिजे आणि त्यानंतर आपलं गाव, तालुका, जिल्हा आणि महाराष्ट्र सांभाळायला पाहिजे, असं म्हणत त्यांनी चंद्रकांतदादांना टोला लगावला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment