अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा कोरोनाने चांगलाच हादरून सोडला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके कोरोना पेशंट सापडल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. यात कोपरगाव तालुक्याने योग्य नियोजन करत तालुका दुसऱ्यांदा कोरोनामुक्त केला.
परंतु तालुक्याचा आनंद क्षणभंगुर ठरला. कारण पुन्हा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. तालुक्यातील सुरेगाव येथील मोतीनगर भागातील एका ४४ वर्षाच्या व्यक्तीची नाशिक येथील खाजगी प्रयोगशाळेत करोनाची तपासणी केली असता
त्याला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रशासनाची पळापळ सुरू झाली. शुक्रवारी तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले.
आत्तापर्यंत १३ रुग्ण कोरोना बाधीत निघाले होते. दरम्यान, तालुक्यातील शेवटच्या चार करोना बाधितावर यशस्वी उपचार करून त्यांना करोना मुक्त केल्याच्या
आंनदात संपुर्ण वैद्यकीय यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी आनंदात करोनामुक्त रुग्णावर पुष्पवृष्टी करुन सुखरुप रुग्णवाहीकेतुन त्यांना घरी सोडले.
करोनामुक्त रुग्णांनी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानत समाधान व्यक्त केले. प्रशासकीय यंत्रणेने दोन दिवसाचा मोकळा श्वास घेतला आणि पुन्हा एका बाधीत रुग्णामुळे कोपरगाव तालुक्याची चिंता वाढवली.
हमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews