कष्टाने पिकवलेले पीक नष्ट झाली…चिंताग्रस्त शेतकऱ्याने स्वतःला संपविले

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नवनाथ रामदास आसने असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेबाबत तलाठ्यांनी अहवाल तयार करून तहसीलदारांना पाठविला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत आसने हे कष्टाळू शेतकरी होते. त्यांच्याकडे ७ एकर शेतजमीन होती. एकत्रित कुटुंब असल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी होती. त्याच्याकडे स्वतः ची बैल जोडी होती.

स्वतः ची शेती कसत असताना गावातील इतर शेतकऱ्यांकडे बैलाची जोडीने शेतीची मशागत करत होते. गावातील माळेवाडी रस्त्यालगत आसने यांची शेती होती. रस्त्यालगत बाजूच्या गटारी हद्दपार झाल्यामुळे अतिवृष्टीचे पाणी सर्व शेतात साचत होते.

पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही सोय नव्हती. त्यामुळे दोन महिने हे पाणी शेतात राहून संपूर्ण खरीप हंगाम नष्ट झाला. सलग दुसऱ्या वर्षी हा प्रकार घडला.

आसने यांची सुमारे तीन एकर सोयाबीन व कपाशी पूर्णपणे वाया गेली. मागील वर्षी पंचनामे झाले मात्र कोणतीही भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नैराश्येतून आसने यांनी जीवन संपविल्याची माहिती स्थानिक शेतकरी यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe