अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- देवदैठण ( ता. श्रीगोंदा ) येथे कोरोनाने चांगलाच कहर केला असून तब्बल आठ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एका वृद्धाचा कोरोनानेच मृत्यू झाला आहे.
त्यामुळे दहा दिवस गाव बंद असल्याने गणेशोत्सवावर कोरोना बंदीचे सावट आहे. ग्रामीण भागात कोविड १९ चा चांगलाच फैलाव झाला आहे. देवदैठण आणि परीसरात अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
देवदैठणला तर कोरोनाने तिसऱ्यांदा शिरकाव केला असून यावेळी मात्र चांगलाच कहर केला आहे. एकाच कुटूंबातील तब्बल सात जण व इतर एकजण असे आठ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून
यामधे पाच पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. तर सात बाधित रुग्णांच्या घरातीलच एका नव्वद वर्षीय वृद्धाचा गुरुवारी ( दि. २० ) यामुळेच मृत्यू झाला आहे.
त्यामुळे आता या कुटूंबातील व्यक्तिंचा संपर्क होऊन गावात कोरोनाचा अजून फैलाव व्हावा नाहि म्हणून पुढील दहा दिवस संपूर्ण गाव सक्तीने बंद ठेवण्यात
येणार असल्याने शनिवार दि. २२ रोजी सुरु होणाऱ्या दहा दिवसीय गणेशोत्सवावर कोरोना बंदिचे सावट असणार आहे. त्यामुळे आधीच साधेपणाने साजरा
करणाऱ्या गणेशोत्सवावर कोरोनामुळे असणाऱ्या बंदीमुळे अनेक गणेश मंडळातील तरुण वर्गात निरुत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved