कुकडी डाव्या कालव्याला आठ दिवसात पाणी सोडणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- येत्या पाच-सहा दिवसांत कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येणार असल्याची ग्वाही आमदार निलेश लंके यांनी दिली असल्याची माहिती माजी सरपंच व निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत लामखडे यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलताना दिली आहे.

लामखडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गुरूवारी आमदार निलेश लंके यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, नामदेवराव थोरात, अमृता रसाळ, सोमनाथ वरखडे, रामदास वरखडे,

खंडू लामखडे, बाळासाहेब लामखडे, दत्तात्रय कुदळे आदी सहभागी झाले होते. यावेळी लामखडे व शिष्टमंडळातील पदाधिकार्‍यांनी निघोज व परिसरातील गावांतील पाण्याची टंचाई कशाप्रकारे आहे याची माहिती दिली.

याबाबत लवकरच संबंधित मंत्री व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी तातडीने चर्चा करुन येत्या पाच जानेवारीला पाणी सोडण्याची ग्वाही आमदार लंके यांनी दिली असल्याची माहिती लामखडे यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment