अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील 2019-20 या वर्षासाठी कुस्तीगीरांचे सहा महिन्याचे व वर्ष भराचे सुमारे साडेतीन लाख रुपयाचे मानधन क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने जिल्हा क्रीडा कार्यालयास अदा करण्यात आले आहे.
कुस्तीगीरांनी जिल्हा क्रीडा कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै.वैभव लांडगे, खजिनदार तथा संघ व्यवस्थापक पै.नाना डोंगरे व तांत्रिक सचिव पै.हंगेश्वर धायगुडे यांनी केले आहे.
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा गादी व माती विभागातील प्राविण्यधारक कुस्तीगीर-वैभव डेंगाळे, आकाश भिंगारे, सागर मोहोळकर, विकास गोरे, केवल भिंगारे, अक्षय कावरे, सचिन मुरकुटे, शुभम लांडगे, सौरभ शिंदे, संदीप लटके, प्रतिक्षा परहर, 63 वी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी किताब लढत 2019-20 माती विभाग- आदर्श रामकट, आकाश सोनटक्के,
विकास तोरडमल, किरण नलवडे, अजित शेळके, आण्णा गायकवाड, सुरेश पालवे, 63 वी वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी किताब लढत 2019-20 गादी विभाग- ओंकार मरकुटे, ऋषीकेश शेळके, स्वप्निल भुजबळ,
विकास सासवडे, केवल भिंगारे, ऋषीकेश लांडे, अनिल ब्राम्हणे, विष्णू खोसे, 42 वी कुमार राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2019-20- मयुर तांबे, सचिन शिंदे, गणेश शेठे, गोविंद बेडके, किरण गव्हाणे,
अभिराज थेटे या कुस्तीगारांसाठी मानधन जिल्हा क्रीडा कार्यालयास अदा करण्यात आलेले आहे. मानधन जाहीर झालेल्या कुस्तीगीरांनी आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्ससह जिल्हा क्रीडा कार्यालयास संपर्क साधून अर्ज भरुन द्यायचा आहे.
अधिक माहितीसाठी पै.नाना डोंगरे 9226735346 व पै.हंगेश्वर धायगुडे 8379970101 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews