अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- शेवगाव- नेवासा रस्त्यावर काळे ओढ्यावरील पुलाजवळ कुकाणा शिवारात कालरात्री ९ ते ९.३० च्या सुमारास हॉटेल मॅनेजर रोहित संजय धाडगे, वय २५ यशराज हॉटेल चिलेखनवाडी, नेवासा याच्या चालकाकडे आरोपी तरुणाने उसने पेसे मागितले होते.
मालकाने ते पेसे दिले नाही तेव्हा रोहित धाडगे हा हॉटेलच्या हिशेबाचे पैसे घेवुन दुचाकीवरुन वरील ठिकाणावरून जात असताना ६ आरोपींनी त्याची दुचाकी अडवून त्याच्या गळ्याला चाकू लावून गळा कापण्याची धमकी देवून त्याच्या जवळील ४२ हजार रुपयाची रोख रक्कम लुदून नेली. आरोपी दोन विनानंबरच्या दुचाकीवरुन आले होते.
काल याप्रकरणी रोहित धाडगे याच्या फिर्यादीवरून रोहित रमेश गडाख, रा. कुकाणा, ता. नेवासा, अभिषेक आप्पासाहेब शिरसाठ, रा. नांदुरशिकारी, ता. नेवासा,
साहीर बशीर पठाण, रा. कुकाणा, ता. नेवासा, नरेंद्र सुभाष गरड, रा. कुकाणा, ता. नेवासा, अक्षय कानडे, पुर्ण नाव माहीत नाही, रा. चिलेखनवाडी, ता. नेवासा, शुभम विश्वनाथ गर्जे, रा. वडुले, ता. नेवासा यांच्याविरुद्ध नेवासा पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved