‘ह्या’ योजनेतून गाव दुष्काळमुक्त होऊ शकते; आ. काळे म्हणतात …

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-मनरेगा योजनेचा प्रसार व प्रचार होण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी ‘ नवी उमेद’ या संस्थेमार्फत ऑनलाईन विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

या वेळी ते म्हणाले की, मनरेगा योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट असलेल्या कामांना प्राधान्य देऊन मजुरांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो व जलसंधारणाची कामे राबवून गाव दुष्काळमुक्त होऊ शकते.

त्यामुळे प्रत्येक सरपंचांनी मनरेगा योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करावी. प्रत्येक गावाचा विकास व्हावा यासाठी शासनाने मनरेगा योजना सुरू केलेली आहे.

या योजनेच्या सहाय्याने जलसंधारणची कामे करून आपली गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या संधी आहेत. त्या माध्यमातून ओढेनाले खोलीकरण, रुंदीकरण,

मोठे साठवण तळे आदी कामे केल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सहजपणे मार्गी लागू शकतो. तसेच मजुरांना वेगवेगळ्या प्रकारची कामे देखील देता येऊ शकतात.

यामध्ये वृक्षलागवड, शाळा वॉलकंपाऊंड करणे, स्मशानभूमी शेड बांधणे तसेच फळबाग उभारणी, वृक्षलागवड व पशुपालनासाठी गोठे बांधणे अशा प्रकारची अनेक कामे या मनरेगा योजनेच्या माध्यमातून बाराही महिने केली

जाऊ शकतात असे सांगत त्यांनी ज्या सरपंचांना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी त्या अडचणी सोडवाव्यात, अशा सूचना केल्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment