शिवपुत्र संभाजी महानाट्याचे नगरमध्ये आयोजन नीलेश लंके प्रतिष्ठाणचा पुढाकार ! छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत खा. अमोल कोल्हे

Ahmednagarlive24 office
Updated:

Ahmednagar News : नीलेश लंके प्रतिष्ठाणच्यावतीने नगरमध्ये १ ते ४ मार्च दरम्यान, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्यात खा. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार आहेत.

ऐतिहासिक महानाट्य प्रथमच नगरकारांच्या भेटीला येत असून, नागरिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन आ. निलेश लंके यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

याबाबत माहिती देताना ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह ज्येष्ठ कलाकार राजन बाने हे औरंगजेबाची भूमिका निभावणार आहे.

सोबतच स्नेहलता वसईकर, महेश कोकाटे, विश्वजीत फडते, अजय तापकीरे, रमेश रोकडे इत्यादी सिनेकलावंतांचा सहभाग या महानाट्यात असणार आहे.

दीडशेहून अधिक स्थानिक कलाकार या महानाट्यात विविध भूमिका साकारणार आहेत. तडाखेबाज संवाद, १२० फुट भव्य दिव्य किल्ल्याचा रंगमंच, खरी खुरी लढाई, हत्ती, घोडे, बैलगाडया, २६ फुटी जहाजावरून जंजिरा मोहीम,

चित्तथरारक घोडेस्वारी, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर आणि दीडशेहून अधिक कलाकारांचा सहभाग या महानाट्यामध्ये असणार आहे.

जगदंब क्रिएशन व महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शनच्या स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या ऐतिहासिक महानाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र वसंतराव महाडीक हे असल्याचे आ. लंके यांनी सांगितले.

२ तास ४० मिनिटांचे महानाटय
शंभू चरित्राचा वेध घेणारे शिवपुत्र संभाजी हे एकमेव व्दितीय महानाट्य २ तास ४० मिनिटांचे आहे. महानाटयामध्ये डॉ. अमोल कोल्हे यांची मैदानातून चित्तथरारक घोडेस्वारी पहावयास मिळणार आहे.

महानाट्यासाठी १५० फुट लांब, ८० फुट रुंद तसेच ५ मजली किल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृतीचा ६७ लाख रूपयांचा सेट लावण्यात येणार आहे.

महानाट्यासाठी २० लाख रूपयांची आकर्षक, राजेशाही ड्रेपरी, ४ लाख रूपयांची शस्त्रात्रे आणि युध्द साहित्य वापरण्यात येणार आहे.

अविस्मरणीय राज्याभिषेक सोहळा
महानाट्यामध्ये नेत्रदिपक आतिषबाजी आणि अविस्मरणीय राज्याभिषेक सोहळा प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळणार आहे.

अत्याधुनिक प्रकाश योजना, थेट प्रेक्षकांमधून गनिमी काव्याने केली जाणारी बुन्हाणपूर मोहीम हे देखील महानाट्याचे आकर्षण असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe