नागरिकांची बेजबाबदारी लॉकडाऊनच्या संकटाला देतेय आमंत्रण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश धुमाकूळ घातला होता. यातच अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले,

मात्र लसीकरण आणि उपायोजना तसेच लॉकडाऊन मुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. जिल्हा अनलॉक करताच नागरिक अत्यंत बेजवाबदार झाले आहे.

मात्र आता त्यांची हीच बेजबाबदारी आता पुन्हा एकदा लॉकडाऊनला आमंत्रण देत आहे. जिल्हा अनलॅाक झालाय, मात्र नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.

स्थानिक पदाधिकारी यांनी जनता कर्फ्यू करावा, व्यापार्‍यांनी धोका ओळखून 9 ते 2 चे नियम करावे, अन्यथा रुग्णसंख्या वाढली तर लॅाकडाऊन अटळ आहे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी म्हटले आहे.

जिल्ह्यात लॅाकडाऊन शिथिल केल्यानंतर अकोले तालुक्याचा दौरा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केला. यावेळी त्यांनी अकोले ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन ऑक्सिजन प्लॅन्टच्या कामाची पाहणी करुन 100 ऑक्सिजन बेडच्या सुविधेबाबत सूचना केल्या.

जिल्ह्यात अनलॅाक केल्यानंतर आज नागरिकांचा दृष्टिकोन बदलल्याचे पाहायला मिळाले. जिल्ह्यात निर्बंध शिथील झालेत. मात्र करोना अद्याप गेलेला नाही.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी झालेली आहे ऑक्सीजन बेडवरील रुग्णसंख्या ही काठावर आहे. करोना रुग्णसंख्या वाढली व ऑक्सिजन बेडची रुग्ण वाढली तर लॅाकडाऊन अटळ आहे. याला जबाबदार नागरिक व व्यापारीच राहतील, असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe