नामांतराचा मुद्दा पुन्हा जोरात; मनसेचे बस स्थानकावर आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-राज्यात गेल्या काही दिवसांपासून शहरांच्या नामांतराची चर्चा चांगल्याच रंगू लागल्या आहेत. या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

आता याच मुद्द्याचे राजकारण देखील होऊ लागले असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करावे, या मागणीसाठी नेवासा बसस्थानक व नेवासा फाटा येथे मनसेच्यावतीने रविवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगर असे स्टिकर लावण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबाद शहराला येत्या २६ जानेवारीपर्यंत देण्यात यावे, यासाठी नेवासा येथील एसटी बसस्थानकातील औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक लावण्यात आले.

यावेळी तरुणांनी घोषणाबाजी केली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संभाजीनगर नावाला विरोध दर्शविल्याने त्यांचा निषेध करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment