अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-अकोले तालुक्यातील राजूर येथील संजय शुक्ला व राहुल शक्ला या बंधूंना अवैध दारु व्यवसाय इतर दाखल गुन्ह्यांबाबत तत्कालीन
पोलीस अधीक्षकांनी 18 जून, 2020 रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका, ठाणे जिल्ह्यातील इगतपुरी तालुका व अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश काढण्यात आले होते.

दरम्यान या दोघा बंधूंचा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढलेला तडीपारीचा आदेश नुकताच औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला आहे.
सदर आदेशाला शुक्ला बंधूंकडून प्रथमतः नाशिक आयुक्तांकडे अपील करण्यात आले होते. या अपिलात दि 26 ऑगस्ट, 2020 रोजी झालेली तडीपारीची कारवाई योग्य नसल्याचे धरले. परंतु त्यांची दोन वर्षे तडीपारीची कारवाई संजय शुक्ला यास एक वर्षाकरीता व राहुल शुक्ला याची नऊ महिनेकरीताचा आदेश करण्यात आला.
या दोन्ही आदेशांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले होते. तेथे अॅड.मयूर साळुंके व अॅड.निखील वाकचौरे यांनी दिलेली नोटीस व केलेली कारवाई चुकीची असून, अतिरिक्त कारवाई करण्यात आली आहे. आजवर त्यांना कुठल्याही गुन्ह्यात शिक्षा झालेली नसून
पोलिसांनी व्यक्तीगत द्वेशातून कारवाई केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत इतर मुद्द्यांवर युक्तीवाद केला. त्यावर न्यायमूर्ती टी.व्ही.नलावडे व एन.जी.शेवलीकर यांच्या खंडपीठाने 07 डिसेंबर, 2020 रोजी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचा व विभागीय आयुक्त नाशिक यांचा तडीपारीचा आदेश रद्द केला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com