लोकप्रतिनिधींचे काम निधी मिळवून देण्याचे असते, फ्लेक्स लावण्याचे नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- मागील वर्षी अतिवृष्टीमुळे फळ उत्पादकांचे नुकसान झाले. यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी विमा भरला होता. मात्र, त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.

सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु. मात्र, पीकविमा मिळवून दिल्याबद्दल कधीही फ्लेक्स बोर्ड लावणार नाही. कारण लोकप्रतिनिधींचे काम निधी मिळवून देण्याचे असते, फ्लेक्स लावण्याचे नाही, अशी मिश्कील टिपणी आमदार आशुतोष काळे यांनी केली.

तालुका बीजगुणन केंद्र येथे आयोजित कौशल्य आधारित डाळिंब छाटणी व विविध मशागतीची कामे या शेतमजूर प्रशिक्षण कार्यक्रम आमदार काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ते म्हणाले, शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळते.

मात्र, दुर्दैवाने भरपाई मिळवून दिल्याचेदेखील फ्लेक्स लावून कोणतेही योगदान नसताना श्रेय घेण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला आहे. यावर्षी ट्रिगर पद्धतीमुळे अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले. डाळिंब, पेरू आदी पिकांच्या ट्रिगर पद्धतीमध्ये बदल करावा, यासाठी कृषी आयुक्तांची भेट घेतली असून त्यां‌नी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ट्रिगर बदलल्यास नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रत्येक मंडलामध्ये एकच पर्जन्यमापक केंद्र आहे. या हवामान केंद्रात झालेल्या पर्जन्यमानाच्या नोंदीनुसार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अवलंबून आहे.

मात्र, अनेकवेळा या हवामान केंद्रावर पावसाची नोंद होत नाही. स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवावी, यासाठी शासन दरबारी प्रयत्न करत असल्याचे काळे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe