अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-ढोरजळगावने (ता. शेवगाव) ग्रामपंचायत निवडणुकीत जगदंबा ग्रामविकास मंडळाने सावशिदबाबा मंडळाचा ९-० ने पराभव करून दणदणीत विजय मिळविला.
जगदंबा मंडळाच्या ८ महिलांच्या हाती सत्तेच्या चाव्या मतदारांनी दिल्याने ग्रामपंचायतीत महिलाराज आले आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत सावशिदबाबा मंडळाचे नेतृत्व करणारे भाऊसाहेब कराड,
ॲड. सदाशिव आरगडे, बाबासाहेब कराड यांच्या मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले. विजयी जगदंबा ग्रामविकास मंडळाचे नेतृत्व भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस गणेश कराड,
ज्येष्ठ मार्गदर्शक मोहनराव उकिर्डे व माजी सरपंच अनंता उकिर्डे यांनी केले. किशोर एकनाथ कराड हे बिनविरोध निवडून आले होते.
जगदंबा मंडळाचे विजयी उमेदवार – कंसात मिळालेली मते – गौरी अनंता उकिर्डे (३४९), मंगल गणेश कराड (३४६), अश्विनी अभय कराड (२७२),
लीलाबाई भीमराज उकिर्डे (२६०), प्रतिभा ज्ञानेश्वर कराड (२९४), मंगल अशोक माळी (२८९), राजश्री रघुनाथ माळी (३१२), शीला शांतवन साके (३०७).
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved